*‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन*मुंबई दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा महत्वपुर्ण निर्णयआता शिवनेरीसह स्लिपर विना A/Cला आरक्षणमुंबई - देवेद्र मेश्रामवाहतूक खाते असलेल्या परिवहन विभागानेदिव्यांग प्रवाशांस रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या रा.प.वसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रवासाकरीताउपलब्ध करुन देणे,. आरक्षित / अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांस राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरुपी राखीव ठेवण्यात यावं. दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनांचा वापर सामान्य प्रवाशांना करता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामी करून देण्यात यावीत.दिव्यांग लाभार्थ्यास आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने आरक्षित करण्यास प्राधान्य देणे. परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यांस सर्वसाधारण आसन आरक्षित करता येईल. दिव्यांग व्यवतींना रा.प.बसेसमध्ये चढण्या/उतरण्यासाठी प्राधान्य द्यावयाचे आहे. याकरीता चालक/वाहक मदत करतील.रा.प.बसमधून दिव्यांग प्रवाशांचे गंतव्य स्थान | उतरण्याचे ठिकाण | येताच रा.प. वाहकाने त्याबाबतची उद्‌घोषणा करुन उतरण्याचे ठिकाण आल्याचे दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे.. दिव्यांग प्रवाशांचा रा.प.प्रवास सुखकर व्हावा या हेतुने योग्य ती मदत रा.प. चालक/वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना करावी. सद्यस्थितीत दिव्यांगांना विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी व जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती. या परिपत्रकाद्वारे विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी / जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. सदर बसेसमध्ये राखीव ठेवण्यात येणा-या आसनांचा आरेखन तक्ता प्रसिद्दीस देण्यात आला आहे. इतर सवलतधारी प्रवाशांना या कार्यालयाच्या वरील संदर्भिय पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनांमध्ये तसेच सुचनामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही.सदरचा बदल करण्यात आलेली विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बस आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीवरती दिनांक ०१.११.२०२४ पासून करण्यात येणार आहे. मात्र विनायातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बसमध्ये आसन व्यवस्था राखीव ठेवून दिव्यांग प्रवाशांना सदरची आसने प्रवासादरम्यान उपलव्ध करुन देण्यात यावीत. सदर बाबतची कार्यवाही परिपत्रक प्रसारीत केलेल्या दिनांकापासून करण्यात यावी व कोणतीही प्रवासी तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.तरी उपरोक्त प्रमाणे बदलाबाबतची माहिती सर्व संबंधित चालक/वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच सर्व आगार व्यवस्थारक यांना देण्यात यावी. सदरची कार्यवाही अत्यंत महत्वाची समजून तातडीने पुर्तता करण्यात यावी. आपणाद्वारे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे ही दिलेल्या पञात नमुद केले आहे......परिवहन विभागामध्ये साध्या बस च्या प्रवासा दरम्यान दिव्यांग आरक्षित असलेल्या सिटवर महिला पुरुषांचे रुमाल टाकुन,एखाद्याला बसवुन थैली ठेऊन जागा पकडण्यात सह प्रवाश्याकडुन होते यामध्ये विनाकारण शारिरीक दुर्बलता असलेला दिव्यांग ञास सहन करत प्रवास करतो परंतु आजतागत निधालेल्या परिवहन विभागाच्या परिपञकानुसार चालक विशेषता वाहक यामध्ये भूमिका निभावतांना कुठेच दिसत नाही अथवा स्थानकावर चढणार्‍या प्रवाशांना दिव्यांग आरक्षित सिटची सुचनाही देत नाही अश्या वेळकाढु वाहकांसाठी प्रत्येक बस स्थानकावर दर्शनीभागावर तक्रार पुस्तीका ठेवण्यात यावी जेणेकरुन प्रवासा दरम्यान दिव्यांगाला तक्रार नोंदविणे सोईचे होईल व त्यावर काय कार्यवाही झाली याची माहीतीही त्या दिव्यांगाला घरपोच देणे याठिकाणी क्रमप्राप्त आहे

*युगधर्म पब्लिक स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला*खामगांव:- स्थानिक युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विषेतः या शिक्षक दिनाचे आयोजन शाळेतील बाल मंत्री मंडळाने केले विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे हे आयोजन अतिशय अचूक आणि शिस्त पद्ध पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हातून सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच माता सरस्वतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर शिक्षणाचे व गुरूचे महत्व या वर एक सुंदर नाटिका सादर करण्यात आली. शाळे मध्ये निवडणूक पद्धतीने घेऊन क्रियेटीव्ह, मोस्ट हेल्पफुल, मोटिवेशनाल टीचर चे नंबर काढण्यात आला. ज्या मध्ये क्रिएटिव्ह टीचर भविन आखारे सर, मोस्ट हेल्पफुल टीचर रेणुका देशमुख तसेच मोटिवेशनल टीचर नीलिमा मोहता मॅम ह्या आहेत. अनुष्का भिसे , समृद्धी जाधव, अक्षरा देशमुख ह्यांनी गुरू चे आपल्या जीवनातील महत्व या विषया वर भाषण दिले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खेळाचे आयोजन केले होते. त्यासोबतच आज शिक्षकांचा वेळापत्रका नुसार त्यांच्या तासिका विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने घेतल्या. शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर यांची भूमिका पृथ्वी ठाकूर तर शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन यांची भूमिका श्रध्दा माळवंदे यांनी आजचा पदभार साभाळला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादवी जोशी आणि अनन्य ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्कृती जाधव हिनी केले. कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्या मागे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले यांचे हे परिश्रम पाहून शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर तसेच मुख्याध्यापक मंगला महाजन संगीता देशमुख मॅम तसेच सर्व शिक्षकानी काहुतुक करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छ दिल्या.

सुजातपुर आमसरी मध्ये डेंगुला आमंञणखामगाव(शेखर तायडे)खामगाव नांदुरा रस्तावर असलेल्या सुजातपुर चिखली आमसरी या गट ग्रामपंचायती अंतर्गत वाढला कचर्‍यासह नाल्यामध्ये गाळसुजातपुर गट ग्रामपंचायती अंतर्गत होत असलेल्या अनागोंदी कारभारामुळे तेथील नागरिक ञस्त झाले आहेतमागील तिन ते चार महिन्यापासुन नाल्यांची साफसफाई नाही संपुर्ण घाण बसविलेल्या पव्हब्लाॅक च्या रस्त्यावर येऊन पडली आहेया घाणीमूळे परिसरात दुर्गधीसह मच्छरांनी हैदोष निर्माण केला आहेराज्यात डेंगुचे रुग्ण आढळत असतांना या ग्रामपंचायती मध्ये रोगराई निर्माण करण्यासाठी डेंगुसह ईतर आजारांना आमंञण देण्याचे काम होत असल्याचे पहावयास मिळत आहे याकडे संबधित विभागासह ग्रामपंचायत सणवाराचा विचार करित स्वच्छता अभियान राबविणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे