Posts
सुजातपुर आमसरी मध्ये डेंगुला आमंञणखामगाव(शेखर तायडे)खामगाव नांदुरा रस्तावर असलेल्या सुजातपुर चिखली आमसरी या गट ग्रामपंचायती अंतर्गत वाढला कचर्यासह नाल्यामध्ये गाळसुजातपुर गट ग्रामपंचायती अंतर्गत होत असलेल्या अनागोंदी कारभारामुळे तेथील नागरिक ञस्त झाले आहेतमागील तिन ते चार महिन्यापासुन नाल्यांची साफसफाई नाही संपुर्ण घाण बसविलेल्या पव्हब्लाॅक च्या रस्त्यावर येऊन पडली आहेया घाणीमूळे परिसरात दुर्गधीसह मच्छरांनी हैदोष निर्माण केला आहेराज्यात डेंगुचे रुग्ण आढळत असतांना या ग्रामपंचायती मध्ये रोगराई निर्माण करण्यासाठी डेंगुसह ईतर आजारांना आमंञण देण्याचे काम होत असल्याचे पहावयास मिळत आहे याकडे संबधित विभागासह ग्रामपंचायत सणवाराचा विचार करित स्वच्छता अभियान राबविणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे
- Get link
- X
- Other Apps
*‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन*मुंबई दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
- Get link
- X
- Other Apps
*दिव्यांग महिला वर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी* *हिंगणघाट*:-आज दिनांक 6/9/2024 राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा जिल्हा वर्धा च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मॅडम हिंगणघाट यांच्यामार्फत दिव्यांग महिलांवर अत्याचार करणाऱ्या नवाजमाला फाशी देण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मागील 15 दिवसाच्या दरम्यान तील गतिमंद महिलेवर अत्याचार करण्यात आले असून ते नराधमावर अजून कुठल्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही त्या सर्व प्रकरणाची दखल घेऊन आज राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने गतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नळधर्माला फाशीची शिक्षा देऊन महाराष्ट्र शासनाला अत्याचार करणाऱ्या वर कठोर कायदा करण्याचे निवेदन देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी राष्ट्रीय फंगल विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोती भाऊ महाकाळकर तालुका अध्यक्ष सतीश गोळकार हिंगणघाट शहर सचिव सचिन भजभुजे वसंता धरमुल देवराव चापले इत्यादी उपस्थित होते
- Get link
- X
- Other Apps
फरार आरोपी हैदर खान अन्वर खान रा. हरी फैल खामगांव यास अटकपो.स्टे. खामगांव शहर येथे अपराध क्रमांक 392/2024 क. 296, 126 (2), 352, 351 (2), 3/5 सह कलम 3(1) (r) (s), 3 (2) (va) अ.जा.ज.प्र.का. चा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामधील आरोपी नामे हैदर खान अन्वर खान रा. हरी फेल खामगांव हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. तसेच त्याचेवर यापुर्वी पो.स्टे. रामतिर्थ जि. नांदेड अपराध क्र. 22/2014 क. 20 (ब) N.D.P.S. अॅक्ट, पो.स्टे. खामगांव शहर अपराध क्रमांक 70/2014 क. 143, 144, 145, 147, 148, 341, 336, 324 भा.द.वि. सह क. 3(1), (10) अत्याचार प्रतिबंधक कायदा असे गुन्हे दाखल होते. सदर गुन्हे केल्यापासुन नमुद आरोपी हैदर खान हा फरार होता. त्याचा तांत्रिक साहाय्याने तसेच गोपनियरित्या माहिती काढुन त्याचा शोध घेतला असता नमुद आरोपी हा दि. 06.09.2024 रोजी घरी आल्याची माहिती मिळाली होती. त्यास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद ठाकरे साहेब यांचे आदेशाने पो. स्टॉफ शोधण्यासाठी गेला असता त्यास पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो मागील दरवाजातुन पळत सुटला. परंतु त्याचा हरीफैल मधील गल्लीबोळामध्ये पाठलाग करुन पोलीसांनी पकडुन अटक केली आहे.सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. विश्व पानसरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक थोरात साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद ठाकरे यांचे आदेशाने पथकातील पो.उप.नि. मनोज वासाडे, स. फौ. सुनिल राऊत, विश्वनाथ जाधव, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, प्रदीप मोठे, पो.कॉ. रविंद्र कन्नर, पो.कॉ. विशाल कोळी, म.पो.कॉ. स्वाती जाधव यांनी केली आहे.
- Get link
- X
- Other Apps
*युगधर्म पब्लिक स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला*खामगांव:- स्थानिक युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विषेतः या शिक्षक दिनाचे आयोजन शाळेतील बाल मंत्री मंडळाने केले विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे हे आयोजन अतिशय अचूक आणि शिस्त पद्ध पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हातून सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच माता सरस्वतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर शिक्षणाचे व गुरूचे महत्व या वर एक सुंदर नाटिका सादर करण्यात आली. शाळे मध्ये निवडणूक पद्धतीने घेऊन क्रियेटीव्ह, मोस्ट हेल्पफुल, मोटिवेशनाल टीचर चे नंबर काढण्यात आला. ज्या मध्ये क्रिएटिव्ह टीचर भविन आखारे सर, मोस्ट हेल्पफुल टीचर रेणुका देशमुख तसेच मोटिवेशनल टीचर नीलिमा मोहता मॅम ह्या आहेत. अनुष्का भिसे , समृद्धी जाधव, अक्षरा देशमुख ह्यांनी गुरू चे आपल्या जीवनातील महत्व या विषया वर भाषण दिले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खेळाचे आयोजन केले होते. त्यासोबतच आज शिक्षकांचा वेळापत्रका नुसार त्यांच्या तासिका विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने घेतल्या. शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर यांची भूमिका पृथ्वी ठाकूर तर शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन यांची भूमिका श्रध्दा माळवंदे यांनी आजचा पदभार साभाळला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादवी जोशी आणि अनन्य ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्कृती जाधव हिनी केले. कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्या मागे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले यांचे हे परिश्रम पाहून शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर तसेच मुख्याध्यापक मंगला महाजन संगीता देशमुख मॅम तसेच सर्व शिक्षकानी काहुतुक करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छ दिल्या.
- Get link
- X
- Other Apps
श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने मावळे यांचा भव्य सत्कार श्री शिव छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान शिवाजीनगर खामगाव च्या वतीने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक माननीय श्री नरेंद्रजी मावळे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती पुरस्कार सन्मानित सोर सर हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश माने वंचित बहुजन महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे शरद भाऊ वसकार साहित्यिक रामदादा मोहिते माजी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे तानाजी व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव ओंकार आप्पा तोडकर हनुमान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी रेठेकर मा. अध्यक्ष राजपाल सिंग चव्हाण ज्ञानदेव मानकर हे होते सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रमाकांत गलांडे यांनी सांगितले की श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने अनेक सेवाभावी कार्य राबवले जातात पण सर्वात मोठे कार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीच्या वेळी दरवर्षी राज्य विदर्भ स्तरीय कबड्डी चे जबरदस्त आयोजन करून कबड्डीपटूना प्रोत्साहित करण्याचे काम तसेच कबड्डी खेळाडूचा प्रसार करण्याचे काम सातत्याने होत असते माननीय नरेंद्रजी मावळे हे प्रतिष्ठानचे पारिवार सदस्य असून कबड्डी खेळाचे ते राष्ट्रीय खेळाडू आहे . आज त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार हा त्यांचा पारिवारिक सोहळा आहे . सुरुवातीलाच प्रतिष्ठानच्यावतीने नरेंद्र मावळे यांचा भव्य सत्कार मान्यवरांच्या तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश माने सचिव विकास चव्हाण रामभाऊ बोंद्रे रमाकांत गलांडे चंद्रकांत रोठेकर महेंद्र पाठक सुभाष शेळके नागोराव अवचार सह प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आला . नंतर गणेश भाऊ चौकसे शरद भाऊ वसतकारराजपाल सिंग चव्हाण यांनी नरेंद्रजी मावळे यांच्या व्यक्तिमत्वा बद्दल तसेच त्यांच्या उत्कृष्ट कबड्डी खेळा च्या बद्दल कौतुकास्पद उद्गार काढले तर अशोक भाऊं सोनवणे यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक क्रीडा प्रतिष्ठान हे शहराचे भूषण असून कबड्डी सारख्या खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम प्रतिष्ठान च्या वतीने होत असते नरेंद् मावळे हे उत्कृष्ट खेळाडू तर उत्कृष्ट अधिकारी होते पण आता पुढे नव्याने नवीन खेळाडू निर्माण करण्यासाठी त्यांना मौलिक असे मार्गदर्शन करावे तरअध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना सोर सरांनी सत्कारमूर्ती नरेंद्रजी मावळे यांच्या जीवनाविषयी अनेक पैलू सांगत विशेष सांगितले की अंबिका क्रीडा कबड्डी संघाचा एकेकाळी जबरदस्त दरारा होता त्यावेळी नरेंद्र मावळे विकास चव्हाण सारखे अनेक राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू या संघात होते सितारामजी तायडे जे छत्रपती पुरस्काराने सन्मानित झाले आहे त्यांनी हे सर्व खेळाडू घडवले नरेंद्र मावळे हे उत्कृष्ट खेळाडू तर होते तसेच शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व होते त्यांना कधी अहंकार आला नाही ते चांगले खेळाडू त्याचप्रमाणे एक चांगले अधिकारी म्हणून कार्यरत राहिले ते अजातशत्रू त्यांचे संबंध सर्वांशी चांगले आता यापुढे त्यांनी कबड्डी खेळासाठी नवीन खेळाडू यांना मौलिक असे मार्गदर्शन करावे श्री संत गजानन महाराज यांचे कृपा त्यांच्यावर अपार राहो ही संत चरणी प्रार्थना करतो असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संभाजीराव टाले यांनी केले यावेळी नरेंद्रजी मावळे यांचा अनेकांनी सत्कार केला त्यात प्रामुख्याने म्हणजे अंबिका क्रीडा मंडळ पदाधिकारी सर्व खेळाडू तसेच सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळ ,श्री संत गजानन महाराज सेवाभावी ट्रस्ट, हनुमान क्रिकेट क्लब, संत गजानन महाराज सेवा प्रकल्प, मोठी देवी सेवाधारी मंडळ, जिल्हा एसटी कष्टकरी संघटना संजू भाऊ शर्मा मित्र परिवार यांच्यासह अनेक संघटना संस्था व मान्यवरांनी तसेच वैयक्तिकरित्या या ठिकाणी नरेंद्रजी मावळे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व परिसरातील लोकांची उपस्थिती होती तर दिव्यांग गरजुंसाठी आपला वाढदिवस ते त्यांना मदत करुन साजरा करतात हे विशेष
- Get link
- X
- Other Apps