Skip to main content
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा महत्वपुर्ण निर्णयआता शिवनेरीसह स्लिपर विना A/Cला आरक्षणमुंबई - देवेद्र मेश्रामवाहतूक खाते असलेल्या परिवहन विभागानेदिव्यांग प्रवाशांस रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या रा.प.वसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रवासाकरीताउपलब्ध करुन देणे,. आरक्षित / अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांस राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरुपी राखीव ठेवण्यात यावं. दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनांचा वापर सामान्य प्रवाशांना करता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामी करून देण्यात यावीत.दिव्यांग लाभार्थ्यास आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने आरक्षित करण्यास प्राधान्य देणे. परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यांस सर्वसाधारण आसन आरक्षित करता येईल. दिव्यांग व्यवतींना रा.प.बसेसमध्ये चढण्या/उतरण्यासाठी प्राधान्य द्यावयाचे आहे. याकरीता चालक/वाहक मदत करतील.रा.प.बसमधून दिव्यांग प्रवाशांचे गंतव्य स्थान | उतरण्याचे ठिकाण | येताच रा.प. वाहकाने त्याबाबतची उद्घोषणा करुन उतरण्याचे ठिकाण आल्याचे दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे.. दिव्यांग प्रवाशांचा रा.प.प्रवास सुखकर व्हावा या हेतुने योग्य ती मदत रा.प. चालक/वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना करावी. सद्यस्थितीत दिव्यांगांना विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी व जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती. या परिपत्रकाद्वारे विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी / जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. सदर बसेसमध्ये राखीव ठेवण्यात येणा-या आसनांचा आरेखन तक्ता प्रसिद्दीस देण्यात आला आहे. इतर सवलतधारी प्रवाशांना या कार्यालयाच्या वरील संदर्भिय पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनांमध्ये तसेच सुचनामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही.सदरचा बदल करण्यात आलेली विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बस आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीवरती दिनांक ०१.११.२०२४ पासून करण्यात येणार आहे. मात्र विनायातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बसमध्ये आसन व्यवस्था राखीव ठेवून दिव्यांग प्रवाशांना सदरची आसने प्रवासादरम्यान उपलव्ध करुन देण्यात यावीत. सदर बाबतची कार्यवाही परिपत्रक प्रसारीत केलेल्या दिनांकापासून करण्यात यावी व कोणतीही प्रवासी तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.तरी उपरोक्त प्रमाणे बदलाबाबतची माहिती सर्व संबंधित चालक/वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच सर्व आगार व्यवस्थारक यांना देण्यात यावी. सदरची कार्यवाही अत्यंत महत्वाची समजून तातडीने पुर्तता करण्यात यावी. आपणाद्वारे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे ही दिलेल्या पञात नमुद केले आहे......परिवहन विभागामध्ये साध्या बस च्या प्रवासा दरम्यान दिव्यांग आरक्षित असलेल्या सिटवर महिला पुरुषांचे रुमाल टाकुन,एखाद्याला बसवुन थैली ठेऊन जागा पकडण्यात सह प्रवाश्याकडुन होते यामध्ये विनाकारण शारिरीक दुर्बलता असलेला दिव्यांग ञास सहन करत प्रवास करतो परंतु आजतागत निधालेल्या परिवहन विभागाच्या परिपञकानुसार चालक विशेषता वाहक यामध्ये भूमिका निभावतांना कुठेच दिसत नाही अथवा स्थानकावर चढणार्या प्रवाशांना दिव्यांग आरक्षित सिटची सुचनाही देत नाही अश्या वेळकाढु वाहकांसाठी प्रत्येक बस स्थानकावर दर्शनीभागावर तक्रार पुस्तीका ठेवण्यात यावी जेणेकरुन प्रवासा दरम्यान दिव्यांगाला तक्रार नोंदविणे सोईचे होईल व त्यावर काय कार्यवाही झाली याची माहीतीही त्या दिव्यांगाला घरपोच देणे याठिकाणी क्रमप्राप्त आहे
Popular posts from this blog