बोगस दिव्यांगांना आळा बसण्यासाठी दे. प्रवरा नगरपरीषदेस निवेदन प्रतिनिधी. देवळाली प्रवरा नगरपरीषद हद्दीतील ज्या दिव्यांगाकडे युनिक आयडी कार्ड किंवा MH बारा अंकी नंबर असणारे ऑनलाइन प्रमाणपत्र नाही आशा दिव्यांगाना 5% निधी देण्यात येऊ नये देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नोंदणीकृत आसलेल्या दिव्यांगाकडे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र MH युडीआयडी नंबर असलेल्याच दिव्यांग प्रमान पञ किंवा युनिक आयडी कार्ड आहे आशाच दिव्यांगास सन 2024 चा 5% निधी देण्यात यावे. ज्या दिव्यांग बांधवांकडे ऑफलाइन दिव्यांग प्रमान पञ आहे आशा दिव्यांगाना 5% निधी देण्यात येऊ नये कारण अहमदनगर जिल्हात बोगस दिव्याग प्रमाणपत्राचे प्रमान खूप वाढले आहेत बोगस दिव्यांग प्रमान पञ घेऊन दिव्यांगाच्या योजनाचा फायदा घेत आहे. नगरपालिकेची व शासनाची फसवनुत केली जात आहे या मुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे तसेच या पुढे दिव्यांगाच्या टंक्केवारी नुसार 5% निधी 40% ते59%, .60% ते 79%,आणि 80% ते 100%आसलेल्या दिव्यांगाना तिन टप्यामधे दिव्यांगाच्या टक्केवारीनुसार जो जास्त दिव्यांग असेल त्याला जास्त प्रमाणात पाच टक्के निधी टक्केवारीप्रमाणे देण्यात यावा जेणेकरून जे अस्थीव्यंग,अंध, मतिमंद जास्त प्रमानात दिव्यांगतत्व आहे ते काही काम धंदा करू शकत नाही आशा दिव्यांगस याचा चांगला लाभ मिळेल.यावेळी देवळाली प्रवरा नगरपरीषदेचे मुख्य अधिकारी यांनी मान्य केले आम्ही , ऑफलाइन दिव्यांगाची छाननी करून फक्त युनिक आयडी कार्ड किंवा MH 12 अंक्की नंबर आसलेल्याच दिव्यांगाना 5% निधी चा लाभ दिला जाईल.पुढिल 8 दिवसात दिव्यांगाच्या बॅक खात्यात 5% निधी वर्ग करण्यात येईल आसे आश्वासन दिले. या वेळी निवेदन देताना उत्तर अहमदनगर जिल्हाअध्यक्ष मा.मधुकर घाडगे साहेब , उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष राजेंद्र सोनवने,उपअध्यक्ष केशव जाधव, सचिव सुखदेव किरतने, संपर्क प्रमुख संदिप बोरसे,मनोज संसारे,नवनाथ पिंपळे,रमेश गुलदगड,मारूती सांगळे, कैफ शेख,बाळासाहेब सोनवने,बाबाजान शेख,शाहीद शेख,कमरूनिसा शेख,पंल्वी माळी,मुस्तकिम शेख,गोरक्षनाथ चव्हाण,दत्तात्रय चव्हाण आदि उपस्थित होते.

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा महत्वपुर्ण निर्णयआता शिवनेरीसह स्लिपर विना A/Cला आरक्षणमुंबई - देवेद्र मेश्रामवाहतूक खाते असलेल्या परिवहन विभागानेदिव्यांग प्रवाशांस रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या रा.प.वसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रवासाकरीताउपलब्ध करुन देणे,. आरक्षित / अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांस राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरुपी राखीव ठेवण्यात यावं. दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनांचा वापर सामान्य प्रवाशांना करता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामी करून देण्यात यावीत.दिव्यांग लाभार्थ्यास आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने आरक्षित करण्यास प्राधान्य देणे. परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यांस सर्वसाधारण आसन आरक्षित करता येईल. दिव्यांग व्यवतींना रा.प.बसेसमध्ये चढण्या/उतरण्यासाठी प्राधान्य द्यावयाचे आहे. याकरीता चालक/वाहक मदत करतील.रा.प.बसमधून दिव्यांग प्रवाशांचे गंतव्य स्थान | उतरण्याचे ठिकाण | येताच रा.प. वाहकाने त्याबाबतची उद्‌घोषणा करुन उतरण्याचे ठिकाण आल्याचे दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे.. दिव्यांग प्रवाशांचा रा.प.प्रवास सुखकर व्हावा या हेतुने योग्य ती मदत रा.प. चालक/वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना करावी. सद्यस्थितीत दिव्यांगांना विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी व जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती. या परिपत्रकाद्वारे विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी / जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. सदर बसेसमध्ये राखीव ठेवण्यात येणा-या आसनांचा आरेखन तक्ता प्रसिद्दीस देण्यात आला आहे. इतर सवलतधारी प्रवाशांना या कार्यालयाच्या वरील संदर्भिय पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनांमध्ये तसेच सुचनामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही.सदरचा बदल करण्यात आलेली विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बस आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीवरती दिनांक ०१.११.२०२४ पासून करण्यात येणार आहे. मात्र विनायातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बसमध्ये आसन व्यवस्था राखीव ठेवून दिव्यांग प्रवाशांना सदरची आसने प्रवासादरम्यान उपलव्ध करुन देण्यात यावीत. सदर बाबतची कार्यवाही परिपत्रक प्रसारीत केलेल्या दिनांकापासून करण्यात यावी व कोणतीही प्रवासी तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.तरी उपरोक्त प्रमाणे बदलाबाबतची माहिती सर्व संबंधित चालक/वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच सर्व आगार व्यवस्थारक यांना देण्यात यावी. सदरची कार्यवाही अत्यंत महत्वाची समजून तातडीने पुर्तता करण्यात यावी. आपणाद्वारे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे ही दिलेल्या पञात नमुद केले आहे......परिवहन विभागामध्ये साध्या बस च्या प्रवासा दरम्यान दिव्यांग आरक्षित असलेल्या सिटवर महिला पुरुषांचे रुमाल टाकुन,एखाद्याला बसवुन थैली ठेऊन जागा पकडण्यात सह प्रवाश्याकडुन होते यामध्ये विनाकारण शारिरीक दुर्बलता असलेला दिव्यांग ञास सहन करत प्रवास करतो परंतु आजतागत निधालेल्या परिवहन विभागाच्या परिपञकानुसार चालक विशेषता वाहक यामध्ये भूमिका निभावतांना कुठेच दिसत नाही अथवा स्थानकावर चढणार्‍या प्रवाशांना दिव्यांग आरक्षित सिटची सुचनाही देत नाही अश्या वेळकाढु वाहकांसाठी प्रत्येक बस स्थानकावर दर्शनीभागावर तक्रार पुस्तीका ठेवण्यात यावी जेणेकरुन प्रवासा दरम्यान दिव्यांगाला तक्रार नोंदविणे सोईचे होईल व त्यावर काय कार्यवाही झाली याची माहीतीही त्या दिव्यांगाला घरपोच देणे याठिकाणी क्रमप्राप्त आहे

*युगधर्म पब्लिक स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला*खामगांव:- स्थानिक युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विषेतः या शिक्षक दिनाचे आयोजन शाळेतील बाल मंत्री मंडळाने केले विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे हे आयोजन अतिशय अचूक आणि शिस्त पद्ध पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हातून सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच माता सरस्वतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर शिक्षणाचे व गुरूचे महत्व या वर एक सुंदर नाटिका सादर करण्यात आली. शाळे मध्ये निवडणूक पद्धतीने घेऊन क्रियेटीव्ह, मोस्ट हेल्पफुल, मोटिवेशनाल टीचर चे नंबर काढण्यात आला. ज्या मध्ये क्रिएटिव्ह टीचर भविन आखारे सर, मोस्ट हेल्पफुल टीचर रेणुका देशमुख तसेच मोटिवेशनल टीचर नीलिमा मोहता मॅम ह्या आहेत. अनुष्का भिसे , समृद्धी जाधव, अक्षरा देशमुख ह्यांनी गुरू चे आपल्या जीवनातील महत्व या विषया वर भाषण दिले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खेळाचे आयोजन केले होते. त्यासोबतच आज शिक्षकांचा वेळापत्रका नुसार त्यांच्या तासिका विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने घेतल्या. शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर यांची भूमिका पृथ्वी ठाकूर तर शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन यांची भूमिका श्रध्दा माळवंदे यांनी आजचा पदभार साभाळला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादवी जोशी आणि अनन्य ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्कृती जाधव हिनी केले. कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्या मागे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले यांचे हे परिश्रम पाहून शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर तसेच मुख्याध्यापक मंगला महाजन संगीता देशमुख मॅम तसेच सर्व शिक्षकानी काहुतुक करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छ दिल्या.

*दिव्यांग महिला वर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी* *हिंगणघाट*:-आज दिनांक 6/9/2024 राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा जिल्हा वर्धा च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मॅडम हिंगणघाट यांच्यामार्फत दिव्यांग महिलांवर अत्याचार करणाऱ्या नवाजमाला फाशी देण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मागील 15 दिवसाच्या दरम्यान तील गतिमंद महिलेवर अत्याचार करण्यात आले असून ते नराधमावर अजून कुठल्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही त्या सर्व प्रकरणाची दखल घेऊन आज राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने गतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नळधर्माला फाशीची शिक्षा देऊन महाराष्ट्र शासनाला अत्याचार करणाऱ्या वर कठोर कायदा करण्याचे निवेदन देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी राष्ट्रीय फंगल विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोती भाऊ महाकाळकर तालुका अध्यक्ष सतीश गोळकार हिंगणघाट शहर सचिव सचिन भजभुजे वसंता धरमुल देवराव चापले इत्यादी उपस्थित होते