श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने मावळे यांचा भव्य सत्कार श्री शिव छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान शिवाजीनगर खामगाव च्या वतीने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक माननीय श्री नरेंद्रजी मावळे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती पुरस्कार सन्मानित सोर सर हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश माने वंचित बहुजन महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे शरद भाऊ वसकार साहित्यिक रामदादा मोहिते माजी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे तानाजी व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव ओंकार आप्पा तोडकर हनुमान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी रेठेकर मा. अध्यक्ष राजपाल सिंग चव्हाण ज्ञानदेव मानकर हे होते सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रमाकांत गलांडे यांनी सांगितले की श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने अनेक सेवाभावी कार्य राबवले जातात पण सर्वात मोठे कार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीच्या वेळी दरवर्षी राज्य विदर्भ स्तरीय कबड्डी चे जबरदस्त आयोजन करून कबड्डीपटूना प्रोत्साहित करण्याचे काम तसेच कबड्डी खेळाडूचा प्रसार करण्याचे काम सातत्याने होत असते माननीय नरेंद्रजी मावळे हे प्रतिष्ठानचे पारिवार सदस्य असून कबड्डी खेळाचे ते राष्ट्रीय खेळाडू आहे . आज त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार हा त्यांचा पारिवारिक सोहळा आहे . सुरुवातीलाच प्रतिष्ठानच्यावतीने नरेंद्र मावळे यांचा भव्य सत्कार मान्यवरांच्या तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश माने सचिव विकास चव्हाण रामभाऊ बोंद्रे रमाकांत गलांडे चंद्रकांत रोठेकर महेंद्र पाठक सुभाष शेळके नागोराव अवचार सह प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आला . नंतर गणेश भाऊ चौकसे शरद भाऊ वसतकारराजपाल सिंग चव्हाण यांनी नरेंद्रजी मावळे यांच्या व्यक्तिमत्वा बद्दल तसेच त्यांच्या उत्कृष्ट कबड्डी खेळा च्या बद्दल कौतुकास्पद उद्गार काढले तर अशोक भाऊं सोनवणे यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक क्रीडा प्रतिष्ठान हे शहराचे भूषण असून कबड्डी सारख्या खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम प्रतिष्ठान च्या वतीने होत असते नरेंद् मावळे हे उत्कृष्ट खेळाडू तर उत्कृष्ट अधिकारी होते पण आता पुढे नव्याने नवीन खेळाडू निर्माण करण्यासाठी त्यांना मौलिक असे मार्गदर्शन करावे तरअध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना सोर सरांनी सत्कारमूर्ती नरेंद्रजी मावळे यांच्या जीवनाविषयी अनेक पैलू सांगत विशेष सांगितले की अंबिका क्रीडा कबड्डी संघाचा एकेकाळी जबरदस्त दरारा होता त्यावेळी नरेंद्र मावळे विकास चव्हाण सारखे अनेक राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू या संघात होते सितारामजी तायडे जे छत्रपती पुरस्काराने सन्मानित झाले आहे त्यांनी हे सर्व खेळाडू घडवले नरेंद्र मावळे हे उत्कृष्ट खेळाडू तर होते तसेच शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व होते त्यांना कधी अहंकार आला नाही ते चांगले खेळाडू त्याचप्रमाणे एक चांगले अधिकारी म्हणून कार्यरत राहिले ते अजातशत्रू त्यांचे संबंध सर्वांशी चांगले आता यापुढे त्यांनी कबड्डी खेळासाठी नवीन खेळाडू यांना मौलिक असे मार्गदर्शन करावे श्री संत गजानन महाराज यांचे कृपा त्यांच्यावर अपार राहो ही संत चरणी प्रार्थना करतो असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संभाजीराव टाले यांनी केले यावेळी नरेंद्रजी मावळे यांचा अनेकांनी सत्कार केला त्यात प्रामुख्याने म्हणजे अंबिका क्रीडा मंडळ पदाधिकारी सर्व खेळाडू तसेच सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळ ,श्री संत गजानन महाराज सेवाभावी ट्रस्ट, हनुमान क्रिकेट क्लब, संत गजानन महाराज सेवा प्रकल्प, मोठी देवी सेवाधारी मंडळ, जिल्हा एसटी कष्टकरी संघटना संजू भाऊ शर्मा मित्र परिवार यांच्यासह अनेक संघटना संस्था व मान्यवरांनी तसेच वैयक्तिकरित्या या ठिकाणी नरेंद्रजी मावळे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व परिसरातील लोकांची उपस्थिती होती तर दिव्यांग गरजुंसाठी आपला वाढदिवस ते त्यांना मदत करुन साजरा करतात हे विशेष

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा महत्वपुर्ण निर्णयआता शिवनेरीसह स्लिपर विना A/Cला आरक्षणमुंबई - देवेद्र मेश्रामवाहतूक खाते असलेल्या परिवहन विभागानेदिव्यांग प्रवाशांस रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या रा.प.वसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रवासाकरीताउपलब्ध करुन देणे,. आरक्षित / अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांस राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरुपी राखीव ठेवण्यात यावं. दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनांचा वापर सामान्य प्रवाशांना करता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामी करून देण्यात यावीत.दिव्यांग लाभार्थ्यास आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने आरक्षित करण्यास प्राधान्य देणे. परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यांस सर्वसाधारण आसन आरक्षित करता येईल. दिव्यांग व्यवतींना रा.प.बसेसमध्ये चढण्या/उतरण्यासाठी प्राधान्य द्यावयाचे आहे. याकरीता चालक/वाहक मदत करतील.रा.प.बसमधून दिव्यांग प्रवाशांचे गंतव्य स्थान | उतरण्याचे ठिकाण | येताच रा.प. वाहकाने त्याबाबतची उद्‌घोषणा करुन उतरण्याचे ठिकाण आल्याचे दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे.. दिव्यांग प्रवाशांचा रा.प.प्रवास सुखकर व्हावा या हेतुने योग्य ती मदत रा.प. चालक/वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना करावी. सद्यस्थितीत दिव्यांगांना विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी व जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती. या परिपत्रकाद्वारे विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी / जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. सदर बसेसमध्ये राखीव ठेवण्यात येणा-या आसनांचा आरेखन तक्ता प्रसिद्दीस देण्यात आला आहे. इतर सवलतधारी प्रवाशांना या कार्यालयाच्या वरील संदर्भिय पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनांमध्ये तसेच सुचनामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही.सदरचा बदल करण्यात आलेली विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बस आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीवरती दिनांक ०१.११.२०२४ पासून करण्यात येणार आहे. मात्र विनायातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बसमध्ये आसन व्यवस्था राखीव ठेवून दिव्यांग प्रवाशांना सदरची आसने प्रवासादरम्यान उपलव्ध करुन देण्यात यावीत. सदर बाबतची कार्यवाही परिपत्रक प्रसारीत केलेल्या दिनांकापासून करण्यात यावी व कोणतीही प्रवासी तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.तरी उपरोक्त प्रमाणे बदलाबाबतची माहिती सर्व संबंधित चालक/वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच सर्व आगार व्यवस्थारक यांना देण्यात यावी. सदरची कार्यवाही अत्यंत महत्वाची समजून तातडीने पुर्तता करण्यात यावी. आपणाद्वारे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे ही दिलेल्या पञात नमुद केले आहे......परिवहन विभागामध्ये साध्या बस च्या प्रवासा दरम्यान दिव्यांग आरक्षित असलेल्या सिटवर महिला पुरुषांचे रुमाल टाकुन,एखाद्याला बसवुन थैली ठेऊन जागा पकडण्यात सह प्रवाश्याकडुन होते यामध्ये विनाकारण शारिरीक दुर्बलता असलेला दिव्यांग ञास सहन करत प्रवास करतो परंतु आजतागत निधालेल्या परिवहन विभागाच्या परिपञकानुसार चालक विशेषता वाहक यामध्ये भूमिका निभावतांना कुठेच दिसत नाही अथवा स्थानकावर चढणार्‍या प्रवाशांना दिव्यांग आरक्षित सिटची सुचनाही देत नाही अश्या वेळकाढु वाहकांसाठी प्रत्येक बस स्थानकावर दर्शनीभागावर तक्रार पुस्तीका ठेवण्यात यावी जेणेकरुन प्रवासा दरम्यान दिव्यांगाला तक्रार नोंदविणे सोईचे होईल व त्यावर काय कार्यवाही झाली याची माहीतीही त्या दिव्यांगाला घरपोच देणे याठिकाणी क्रमप्राप्त आहे

*युगधर्म पब्लिक स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला*खामगांव:- स्थानिक युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विषेतः या शिक्षक दिनाचे आयोजन शाळेतील बाल मंत्री मंडळाने केले विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे हे आयोजन अतिशय अचूक आणि शिस्त पद्ध पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हातून सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच माता सरस्वतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर शिक्षणाचे व गुरूचे महत्व या वर एक सुंदर नाटिका सादर करण्यात आली. शाळे मध्ये निवडणूक पद्धतीने घेऊन क्रियेटीव्ह, मोस्ट हेल्पफुल, मोटिवेशनाल टीचर चे नंबर काढण्यात आला. ज्या मध्ये क्रिएटिव्ह टीचर भविन आखारे सर, मोस्ट हेल्पफुल टीचर रेणुका देशमुख तसेच मोटिवेशनल टीचर नीलिमा मोहता मॅम ह्या आहेत. अनुष्का भिसे , समृद्धी जाधव, अक्षरा देशमुख ह्यांनी गुरू चे आपल्या जीवनातील महत्व या विषया वर भाषण दिले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खेळाचे आयोजन केले होते. त्यासोबतच आज शिक्षकांचा वेळापत्रका नुसार त्यांच्या तासिका विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने घेतल्या. शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर यांची भूमिका पृथ्वी ठाकूर तर शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन यांची भूमिका श्रध्दा माळवंदे यांनी आजचा पदभार साभाळला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादवी जोशी आणि अनन्य ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्कृती जाधव हिनी केले. कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्या मागे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले यांचे हे परिश्रम पाहून शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर तसेच मुख्याध्यापक मंगला महाजन संगीता देशमुख मॅम तसेच सर्व शिक्षकानी काहुतुक करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छ दिल्या.

*दिव्यांग महिला वर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी* *हिंगणघाट*:-आज दिनांक 6/9/2024 राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा जिल्हा वर्धा च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मॅडम हिंगणघाट यांच्यामार्फत दिव्यांग महिलांवर अत्याचार करणाऱ्या नवाजमाला फाशी देण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मागील 15 दिवसाच्या दरम्यान तील गतिमंद महिलेवर अत्याचार करण्यात आले असून ते नराधमावर अजून कुठल्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही त्या सर्व प्रकरणाची दखल घेऊन आज राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने गतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नळधर्माला फाशीची शिक्षा देऊन महाराष्ट्र शासनाला अत्याचार करणाऱ्या वर कठोर कायदा करण्याचे निवेदन देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी राष्ट्रीय फंगल विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोती भाऊ महाकाळकर तालुका अध्यक्ष सतीश गोळकार हिंगणघाट शहर सचिव सचिन भजभुजे वसंता धरमुल देवराव चापले इत्यादी उपस्थित होते