Skip to main content
'विद्यालयासमोरील रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी - खामगाव -(संतोष आटोळे) ,,,अभाविप ची मागणी'स्थानिक श्री जी वी मेहता नवयुग विद्यालय व सरस्वती विद्या मंदिर समोरील रस्त्यावर खुप खड्डे पडले आहेत. रेल्वे गेट जवळ अंडरग्राऊंड मार्गाचे काम सुरू असल्याने या मार्गावरुन जडवाहनाची वाहतूक सुध्दा होत आहे त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे तसेच खड्डे पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.सध्या या मार्गावर लहान सहान अपघात होत आहेत हे टाळण्यासाठी न.प. ने ताबडतोब रस्त्याची दुरुस्ती करावी अश्या मागणी चे निवेदन अभाविप च्या शिष्टमंडळाने सीईओ यांना दिले.या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते संजय भोजने,अभाविप चे संयोजक ऋषिकेश वाघमारे, जिल्हा सह संयोजक सानिका राठोड, नगर मंञी गणेश कठाळे,नगर स्कुली विद्यार्थी कार्य प्रमुख वेदांत भोजने,नगर जनजाती प्रमुख दिपक राऊत, कार्यालयसहप्रमुख महेश जाधव, मिशन साहसी प्रमुख वैष्णवी जवळकर,एसएफएस प्रमुख शुभम राजपूत यांचा समावेश होता.
Popular posts from this blog