स्व. भाऊसाहेब फुंडकर कृषी मित्रपरीवार व स्व.डॅा.का.शा.तिडके प्रतिष्ठानकडुन उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धेत दिली अकरा बैलजोडींना रोख बक्षीसे मनोज भगतग्रामिण प्रतिनीधी तेल्हाराहिवरखेड (ता. तेल्हारा) शहरात सालाबाद प्रमाणे शेतकरी वर्ग आपल्याला शेतीस मदत करणाऱ्या बैल राजाचा पोळा सण मनोभावे साजरा करतो. अगोदरचे दिवशी खांदापुजन करुन पोळ्याचे दिवशीचे जेवणाचे आमंत्रण देतो. पोळ्याचे दिवशी बैलांना रंग, झुला इत्यादी आभुषणांनी सजवुन भोलेनाथाच्या दर्शनाला शंकर संस्थान येथे वाजत गाजत आणन्यात आले. अशा या बैल पोळ्यात सालाबाद प्रमाणे देवळीवेस शंकर संस्थानला पोळ्याचा मान माजी आमदार स्वर्गीय डॅा.का.शा.तिडके परिवारातील डॅा.रामदादा तिडके व नंदुकाका तिडके, कृष्णादादा तिडके, कैलासदादा , बंजरगभाऊ, उमेश गुरुजी सर, सूनील तिडके यांना असून तिडके वाड्यातुन गूढी ऊमेश तिडके यांचे खाद्यावर घेऊन सजविलेल्या बैलांची वाजत गाजत आली. तेथे मंदीरात व महादेवाचे पिंडीला पुरोहितामार्फत डॅा. रामदादा तिडके व कृष्णादादा तिडके यांचे हस्ते अभिषेक व नंतर महाआरती झाली. या दरम्यान महादेवाची भजने शेतकर्‍यांकडून मनोभावे गायल्या गेली. यावर्षीच्या पोळा सणाला सततधार पाऊस सूरुच होता. पोळा भरतो की नाही असे वाटत होते, परंतु भोलेनाथाचे कृपेने पाच वाजता पाऊस थांबला. शेतकर्‍यानी सजवलेले बैल पोळ्यात आणली. या सणानिमीत्त स्व. भाऊसाहेब फुंडकर कृषी मित्रपरीवार व माजी आमदार स्व.डॅा.का.शा.तिडके प्रतिष्ठानकडुन उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर बक्षीस वितरण भागवताचार्य संतोष महाराज टिकार व ASI महादेव नेवारे यांचे व कृष्णादादा तिडके, सूधाकर डालके,ऊमेश तिडके, बाळासाहेब नेरकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक बैलजोडी मालकांना नारळ टोपी देउन सन्मानित करण्यात आले. यामधे 5001 रुपये स्व भाऊसाहेब फुंडकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ भाऊसाहेब फुंडकर कृषीमित्र परीवार तर्फे ओम अस्वार व अशोक अस्वार यांच्या भोलेनाथ पार्वती व भोलेनाथाची कावड बैलजोडीवर देखावा या जोडीला तर दूसरे बक्षीस माजी आमदार स्व.डॅा. का.शा. तिडके प्रतिष्ठान कडून 2001 रुपयाचे बक्षीस मंगेश रामकृष्णा ताळे यांचे बैलांना तर तिसरे बक्षीस 1501 रु राठी कृषी सेवा केंद्र यांचे कडून वसंता राऊत याचे बैलाला, चवथे बक्षीस वृषाली सेवा केंद्र बबलू टोहरे कडुन 1101 रुपये यांचे कडुन देवीदास नाठे यांचे बैलाना,पाचवे बक्षीस नागवेली कृषी सेवा केंद्र कडून रु 701 विजय येनकर यांचे जोडीला, सहावे बक्षीस रुची कृषी सेवा केंद्र 701 रुपयाचे रमेश नाठे यांचे जोडीला तसेच प्रोत्साहनपर सातवे बक्षीस माऊली कृषी सेवा केंद्र कडून 500रु गजानन भाकरे यांचे बैलाना, आठवे बक्षीस लक्ष्मी अॅग्रो मार्ट राजु काळे कडुन रवि दातकर यांना 500रु, नववे कृष्णा अॅग्रो एजंसीजचे डिगाबंर ढगे कडुन तसेच जय भोले हार्डवेअर कडून 500रु प्रकाश ढबाले यांना, प्रोत्साहनपर अमुल दुध संकलन केंद्रकडुन रु 501 चे गोपाल घूंगड यांचे टावर वरील सर्जाराजा जोडीला व अबांदास वनकर यांच्या नंदीबैलाला प्रमानपत्र व श्रीफळ देऊन बैलमालकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बैलजोडी परीक्षक सर्वश्री अनिल कराळे, गजानन मानकर, गोपाल घुंगड मंदीर ट्रस्टी बंजरग तिडके, गजानन भटकर,घुंगळ सर, सुधाकर परनाटे,जयेश बोहरा, आनंद बोहरा , सुधा डालके यांनी संपुर्ण बैलपोळ्यातील उत्कृष्ट बैलजोडींची निवड केली. बक्षीस वितरणानंतर पिंडीला घाट लावून पोळा फुटल्याचे जाहीर करण्यात आले.ठाणेदार श्री पांडव व त्यांचे सहकारी बीट जमादार श्री नेवारे गृहरक्षक दल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा महत्वपुर्ण निर्णयआता शिवनेरीसह स्लिपर विना A/Cला आरक्षणमुंबई - देवेद्र मेश्रामवाहतूक खाते असलेल्या परिवहन विभागानेदिव्यांग प्रवाशांस रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या रा.प.वसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रवासाकरीताउपलब्ध करुन देणे,. आरक्षित / अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांस राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरुपी राखीव ठेवण्यात यावं. दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनांचा वापर सामान्य प्रवाशांना करता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामी करून देण्यात यावीत.दिव्यांग लाभार्थ्यास आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने आरक्षित करण्यास प्राधान्य देणे. परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यांस सर्वसाधारण आसन आरक्षित करता येईल. दिव्यांग व्यवतींना रा.प.बसेसमध्ये चढण्या/उतरण्यासाठी प्राधान्य द्यावयाचे आहे. याकरीता चालक/वाहक मदत करतील.रा.प.बसमधून दिव्यांग प्रवाशांचे गंतव्य स्थान | उतरण्याचे ठिकाण | येताच रा.प. वाहकाने त्याबाबतची उद्‌घोषणा करुन उतरण्याचे ठिकाण आल्याचे दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे.. दिव्यांग प्रवाशांचा रा.प.प्रवास सुखकर व्हावा या हेतुने योग्य ती मदत रा.प. चालक/वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना करावी. सद्यस्थितीत दिव्यांगांना विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी व जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती. या परिपत्रकाद्वारे विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी / जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. सदर बसेसमध्ये राखीव ठेवण्यात येणा-या आसनांचा आरेखन तक्ता प्रसिद्दीस देण्यात आला आहे. इतर सवलतधारी प्रवाशांना या कार्यालयाच्या वरील संदर्भिय पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनांमध्ये तसेच सुचनामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही.सदरचा बदल करण्यात आलेली विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बस आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीवरती दिनांक ०१.११.२०२४ पासून करण्यात येणार आहे. मात्र विनायातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बसमध्ये आसन व्यवस्था राखीव ठेवून दिव्यांग प्रवाशांना सदरची आसने प्रवासादरम्यान उपलव्ध करुन देण्यात यावीत. सदर बाबतची कार्यवाही परिपत्रक प्रसारीत केलेल्या दिनांकापासून करण्यात यावी व कोणतीही प्रवासी तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.तरी उपरोक्त प्रमाणे बदलाबाबतची माहिती सर्व संबंधित चालक/वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच सर्व आगार व्यवस्थारक यांना देण्यात यावी. सदरची कार्यवाही अत्यंत महत्वाची समजून तातडीने पुर्तता करण्यात यावी. आपणाद्वारे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे ही दिलेल्या पञात नमुद केले आहे......परिवहन विभागामध्ये साध्या बस च्या प्रवासा दरम्यान दिव्यांग आरक्षित असलेल्या सिटवर महिला पुरुषांचे रुमाल टाकुन,एखाद्याला बसवुन थैली ठेऊन जागा पकडण्यात सह प्रवाश्याकडुन होते यामध्ये विनाकारण शारिरीक दुर्बलता असलेला दिव्यांग ञास सहन करत प्रवास करतो परंतु आजतागत निधालेल्या परिवहन विभागाच्या परिपञकानुसार चालक विशेषता वाहक यामध्ये भूमिका निभावतांना कुठेच दिसत नाही अथवा स्थानकावर चढणार्‍या प्रवाशांना दिव्यांग आरक्षित सिटची सुचनाही देत नाही अश्या वेळकाढु वाहकांसाठी प्रत्येक बस स्थानकावर दर्शनीभागावर तक्रार पुस्तीका ठेवण्यात यावी जेणेकरुन प्रवासा दरम्यान दिव्यांगाला तक्रार नोंदविणे सोईचे होईल व त्यावर काय कार्यवाही झाली याची माहीतीही त्या दिव्यांगाला घरपोच देणे याठिकाणी क्रमप्राप्त आहे

*युगधर्म पब्लिक स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला*खामगांव:- स्थानिक युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विषेतः या शिक्षक दिनाचे आयोजन शाळेतील बाल मंत्री मंडळाने केले विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे हे आयोजन अतिशय अचूक आणि शिस्त पद्ध पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हातून सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच माता सरस्वतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर शिक्षणाचे व गुरूचे महत्व या वर एक सुंदर नाटिका सादर करण्यात आली. शाळे मध्ये निवडणूक पद्धतीने घेऊन क्रियेटीव्ह, मोस्ट हेल्पफुल, मोटिवेशनाल टीचर चे नंबर काढण्यात आला. ज्या मध्ये क्रिएटिव्ह टीचर भविन आखारे सर, मोस्ट हेल्पफुल टीचर रेणुका देशमुख तसेच मोटिवेशनल टीचर नीलिमा मोहता मॅम ह्या आहेत. अनुष्का भिसे , समृद्धी जाधव, अक्षरा देशमुख ह्यांनी गुरू चे आपल्या जीवनातील महत्व या विषया वर भाषण दिले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खेळाचे आयोजन केले होते. त्यासोबतच आज शिक्षकांचा वेळापत्रका नुसार त्यांच्या तासिका विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने घेतल्या. शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर यांची भूमिका पृथ्वी ठाकूर तर शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला महाजन यांची भूमिका श्रध्दा माळवंदे यांनी आजचा पदभार साभाळला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादवी जोशी आणि अनन्य ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्कृती जाधव हिनी केले. कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्या मागे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले यांचे हे परिश्रम पाहून शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर तसेच मुख्याध्यापक मंगला महाजन संगीता देशमुख मॅम तसेच सर्व शिक्षकानी काहुतुक करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छ दिल्या.

*दिव्यांग महिला वर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी* *हिंगणघाट*:-आज दिनांक 6/9/2024 राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा जिल्हा वर्धा च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मॅडम हिंगणघाट यांच्यामार्फत दिव्यांग महिलांवर अत्याचार करणाऱ्या नवाजमाला फाशी देण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मागील 15 दिवसाच्या दरम्यान तील गतिमंद महिलेवर अत्याचार करण्यात आले असून ते नराधमावर अजून कुठल्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही त्या सर्व प्रकरणाची दखल घेऊन आज राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने गतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नळधर्माला फाशीची शिक्षा देऊन महाराष्ट्र शासनाला अत्याचार करणाऱ्या वर कठोर कायदा करण्याचे निवेदन देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी राष्ट्रीय फंगल विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोती भाऊ महाकाळकर तालुका अध्यक्ष सतीश गोळकार हिंगणघाट शहर सचिव सचिन भजभुजे वसंता धरमुल देवराव चापले इत्यादी उपस्थित होते