Skip to main content
बुलढाणा अर्बन शाखा अटाळी येथील रोखपाल श्री.प्रशांत रत्नपारखी यांचा प्रामाणिकपणा. बुलढाणा अर्बन विभाग खामगाव अंतर्गत शाखा अटाळी येथे दिनांक 04 सप्टेंबर रोजी अटाळी येथील दंतरोग तज्ञ डॉ. अक्षय पाटील यांनी त्यांच्या बचत खात्यात रक्कम जमा करण्यासाठी खात्याची रकमेचा तपशील लिहिलेली स्लीप आणि रक्कम रोखपाल श्री.रत्न पारखी यांच्या कडे दिली.आणि ते त्यांच्या दवाखान्यात गर्दी आहे म्हणून निघून गेले.काही वेळानंतर रोखपाल यांनी रोख मोजली असता स्लीप वर लिहिलेल्या रकमेपेक्षा रोख दहा हजारांनी जास्त असल्याचे त्यांच्या लक्षात आले.श्री.रत्न पारखी यांनी ही बाब शाखा व्यवस्थापक सौ.वर्षा पळसोदकर यांच्या निदर्शनास आणून दिली. शाखा व्यवस्थापक यांनी शाखेत झालेले व्यवहार आणि रोख रक्कम यांची तपासणी केली. रक्कम जास्त असल्याचे विभागीय व्यवस्थापक श्री.प्रकाश सावळे यांना सांगितले. त्यांनीहि परत शहनिशा केली. नंतर डॉ.पाटील यांना शाखेत बोलवून त्यांच्या कडून योग्य ती माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांना 10 हजार रुपये जास्त आल्याचे सांगून रक्कम परत केली.डॉ.अक्षय पाटील यांनी रक्कम आपणहून परत दिल्या बद्दल बुलढाणा अर्बन परिवाराचे कौतुक केले आणि रोखपाल श्री.प्रशांत रत्नपारखी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Popular posts from this blog